कामगार पुतळ्याची युवक कॉग्रेच्यावतीने डागडूजी करून रंगरंगोटी केली
पुणे : 1 मे हा म हाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु या कामगार दिनीच पुणे महानगपालिकेला कामगार पुतळ्याचा विसर पडला असून कामगार पुतळ्याची पडझड झाली पाहून सुध्दा अधिकारी पडझड झालेल्या पुतळ्याच फक्त हार घालून जातात, ही एक प्रकारे कामगार पुतळ्याची विटंबनाच आहे असा आरोप पुणे शहर युवक काँग्रेसचे वरिष्ट उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी केला आहे.
कोणत्याही महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असेल तर त्या पुतळ्यांची डागडूची करण्यात येते आणि स्वत: आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक आवर्जून पुष्पहार अर्पण करतात. परंतू याच खासदार, आमदार , नगरसेवक आणि महापौरांना कामगार दिवसाचाच विसर पडला आहे. पुणे न्यायालयामागे कामगारांचा प्रतिक म्हणून कामगार पुतळा उभारण्यात आला आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून या कामगार पुतळ्याची पडझड झाली आहे. हात आणि पाय मोडकळीस आला आहे. तसेच संपुर्ण रंग उडाला आहे. याबाबत स्थानिक रहिवाश्यांकडून वेळोवेळी स्थानिक नगरसेवक तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्यांकडे दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. परंतू यांकडे जाणून बूजून दुर्लक्ष केले जात आहे. ऐवढेच नव्हे स्थानिक कामगारांनी पुणे महानगरपालिकेकडे स्वत: दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला तरी देखील त्यांना ते करून दिले नाही.
या सर्व कारणांमुळेच पुणे शहर युवक काँग्रेस वतीने आज कामगार पुतळ्याची डागडूजी करून पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले. यावेळी पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मलके, वरिष्ट उपाध्यक्ष सौरभ अमराळे, निलेश सांगळे, परवेझ तांबोळी, सौरभ शिंदे अक्षय नवगिरे उपस्थित होते.यावेळी महानगरपालिकेचा व भाजप प्रणित सत्तेचा निषेध करण्यात आला.