पुणे, दि. 2 : पुणे विभागातील 10 लाख 22 हजार 388 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 3 हजार 227 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 57 हजार 979 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 22 हजार 860 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.97 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 49 हजार 183 रुग्णांपैकी 7 लाख 39 हजार 304 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 96 हजार 734 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.06 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 5 हजार 330 रुग्णांपैकी 82 हजार 542 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 466 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 2 हजार 611 रुग्णांपैकी 82 हजार 100 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 714 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 77 हजार 5 रुग्णांपैकी 61 हजार 303 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 400 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 69 हजार 98 रुग्णांपैकी 57 हजार 139 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 665 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 16 हजार 650 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 918, सातारा जिल्ह्यात 2 हजार 49, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 233, सांगली जिल्ह्यात 1 हजार 327 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 123 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 14 हजार 454 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 361, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 836, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 438, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 39 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 780 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 22 लाख 10 हजार 335, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 5 हजार 297, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 22 हजार 651, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 60 हजार 516 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 लाख 64 हजार 628 नागरिकांचा समावेश आहे.