शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी प्रभाग क्रमांक 30 येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी तालीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय वाजे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे
दिलेल्या निवेदनात अक्षय वाजे यांनी सांगितले आहे की 1 मे पासून सुरू १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू होत आहे या वयोगटातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर अतिरिक्त भार वाढेल व नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे तसेच केंद्रावर मोठी गर्दी होऊन संसर्गही वाढू शकतो या कारणास्तव फुगेवाडी येथे लसीकरण केंद्र सुरू करावे.
Advertisement