पुणे : पंढरपूरचा निकाल घोषित झाला असून भाजप चे श्री समाधान अवताडे निवडून आले आहे. भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी समाधान अवताडे आणि प्रशांत मालक यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, या महाविकास सरकारच्या काळात त्यांना शक्य वाटले नाही ते भाजपा ने करून दाखवलं. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केलं हा त्याचा विजय आहे. सरकार विरोधात जनतेच्या मनात रोष आहे म्हणून हा विजय शक्य झाला. ”ठाकरे सरकार हे खऱ्या अर्थाने अपयशी सरकार आहे, जनतेचे या सरकारला काही घेणे देणे नाही , मंत्री भ्रष्टाचारात मग्न आहेत , शेतकऱ्यांना पीक विमा नाही, कोरोनाच्या काळात इतर दुर्लभ घटकांना कुठलाही निधी नाही, पॅकेज नाही, गरीब समाजाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष म्हणूनच पंढरपूर मधील जनतेने अवताडे याच्या माध्यमातून खरा कॉल ठाकरे सरकारला दिला आहे.
”देवेंद्र फडणवीस यांनी अवताडे यांना निवडून द्या, मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो” असे म्हणाले होते.व त्याच्या सभांचा मोठा परिणाम झाला होता.
राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचे श्रेय प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटलांनी यांनी कार्यकर्ते आणि परिचारक व आवताडे
यांच्या एकीला दिलं आहे.
प्रचार प्रमुख माजी मंत्री बाळा भेगडे व प्रदेश संघटन मंत्री श्री श्रीकांत भारतीय यांनी चांगली रणनीती आखली त्यांचा हा परिणाम आहे,मी स्वतः तसेच आमदार श्री महेश लांडगे यांनी व पिंपरी चिंचवड मधील अनेक कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन चांगला प्रचार केला याचे निकालामुळे समाधान वाटले.