मुंबई दि. २ मे – पश्चिम बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. परंतु ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय त्याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या कारनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे परंतु सत्यपरिस्थिती माहीत असतानाही भाजपने जो रडीचा डाव सुरू केलाय त्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Advertisement