शबनम न्यूज / पिंपरी
कोरोनाग्रस्त रुग्णांकडून उपचार करीता दाखल करून घेण्या साठी एक लाख रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी स्पर्श प्रा. लि. चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात २३ एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदास नगर, चिखलीगाव) यांना दाखल करण्यात आले .डॉ. प्रवीण जाधव याने एक लाख रुपये घेतले. दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून ऍडमिट करण्यासाठी पैसे लागतात, असे सांगून त्यांची फसवणूक केली.
जाधव याने घेतलेल्या एक लाख मधून कट प्रॅक्टीस म्हणून वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलचे दोन्ही डॉक्टरांना दिले. परन्तु उपचारादरम्यान सुरेखा वाबळे यांचा मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी रविवारी (दि. २) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांना अटक करण्यात आली आहे.