शबनम न्युज / मनोरंजन
माझ्या नवऱ्याची बायको’ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून अभिनेत्री आदिती द्रविड ही लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री अदिती द्रविड आता भरतनाट्यमचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कलावंतांना नृत्याचे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहे. अदितीने पुणे येथील भारती विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले असून, भरतनाटयममध्ये एमए केले आहे, तसेच गंधर्व महाविद्यालयाच्या विशारद पर्यंतच्या परीक्षांमद्धे ती अव्वल गुणांसह प्रथम श्रेणीमद्धे उत्तीर्ण झाली. इयत्ता पाचवीत असल्यापासून अदितीने गुरू स्वाती दैठणकर यांच्याकडे नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे.
शनायाची मैत्रीण म्हणून ती प्रेक्षकांना परिचित आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने आदितीला एक ओळख मिळवून दिली. ‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकात तिने प्रमुख भूमिका केली आहे. ‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे २०१७ साली संस्कृती कलादर्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या नव्या भूमिकेबाबत अदिती सांगते कि “खरंतर भरतनाट्यम नृत्यमुळेच माझी अभिनयाची ओळख झाली, खूप आधीपासून भरतनाट्यम हा कलाप्रकार शात्रशुद्ध पद्धतीने कलावंतापर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती, पण चित्रीकरणासाठी होणाऱ्या पुणे-मुंबई प्रवासामुळे ते शक्य होत नव्हते. लॉकडाऊन मुले सर्व जण सध्या घरी आहेत त्यामुळे भरतनाट्यम ऑनलाईन माध्यमातून कलावंतांपर्यंत पोहोंचवण्याचा एक प्रयत्न आहे. आणि त्याला सोशल मीडियावर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे”.