- प्लाझ्मा दानकर्त्याकरिता लकी ड्रॉ चे आयोजन
- लकी ड्रॉ द्वारे एक्टिवा टू व्हीलर देण्यात येणार
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या कोरोनाचा थैमान थांबविण्याकरिता अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. प्रशासनाने दिलेले नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सर्व स्तरातून केले जात आहेत. परंतु राज्यात तसेच आपल्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही एक जीवनदायी ठरले आहे. प्लाझ्मा दान करावे,असे अनेक माध्यमातून आवाहन करण्यात येत आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाने 28 दिवसाच्या आत प्लाझ्मा दान करायचा आहे. याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील साईनाथ सोशल फाउंडेशन च्या वतीने 2000 प्लाजमा डोनर तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याकरिता फाउंडेशन वतीने सर्व प्लाझ्मा दान करणाऱ्या मधून एका व्यक्तीला लकी ड्रॉ द्वारे एक्टिवा टू व्हीलर देण्यात येईल. असेही सांगण्यात आले आहे. ज्यांना ज्यांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांनी फक्त एक फॉर्म भरून द्यायचा आहे. हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. प्लाझ्मा दान केल्यानंतर या प्लाझ्मा दात्यांमधून एकाला लकी ड्रॉ द्वारे एक्टिवा टू व्हीलर देण्यात येणार असल्याचे साईनाथ सोशल फाउंडेशन वतीने जाहीर करण्यात आले आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी 80 54 50 99 99 या नंबर वर संपर्क करण्याचेही आवाहन साईनाथ सोशल फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.
संकल्प २००० प्लाझ्मा डोनर तयार करण्याचा..!
घरात बसून आपण सामाजिक बांधिलकी जपू शकतो,तुमचे फक्त सहकार्य हवे, बाकी सर्व आम्ही करू. 🙏
ज्यांना ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांनी फक्त हा फॉर्म भरून द्यावा.. याचा उपयोग आपल्याला भविष्यात सहज प्लाझ्मा उपलब्ध होण्यासाठी होईल..
लिंक – https://forms.gle/9Mm1GHDUEvx7fMr99
सर्व प्लाझ्मा दानकर्त्यांमधून एका व्यक्तीला लकी ड्रॉ द्वारे ऍक्टिवा टू-व्हीलर देण्यात येईल.
संपर्क – नगरसेवक वसंतशेठ बोराटे जनसंपर्क कार्यालय – ८०५४५०९९९९
टिप : या उपक्रमात आपण देखील साईनाथ सोशल फाऊंडेशनच्या वतीने सहभागी व्हावे.