शबनम न्युज / पिंपरी
देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन व मावळ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री प्रकाश भाऊ हगवणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते देहू आणि पंचक्रोशी इतिहासमधील सर्वात मोठे रक्तदान म्हणून तब्बल २३० बाटल्यांची नोंद झाली. कोरोना संक्रमण काळात देखील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कामगार सेल उपाध्यक्ष योगेश जाधव यांनी व स्वागत सोशल मिडिया अध्यक्ष अमित घेनंद यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुनिल आण्णा शेळके,मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, संतसेवक जालिंदर महाराज काळोखे, रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, मा.सभापती हेमलता काळोखे,देहूरोड अध्यक्षा शीतल हगवने,देहू अध्यक्ष वैशाली टिळेकर, मा.सरपंच सुनीता टिळेकर,जाई मोरे, ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्ष शेखर परंडवाल,विशाल परदेशी,सुनिल कडूसकर, बापू मुसुडगे,अनिल विधाटे,विशाल काळोखे,कुणाल काळोखे, भरत काळोखे,शैलेश चव्हाण, खलील शेख,माणिक जाधव,दिनेश बोडके,सोमनाथ चव्हाण, मचिंद्र चव्हाण,चंद्रकांत भोसले, रंजीत नागने, संदीप आव्हाळे,सागर गायकवाड, प्रशांत बेंडभर, संदीप गार्डे,विजय सुतार,सचिन इंगवले,विजय फिरके,राहुल साळुंके,सुनिल सकुंडे,सूरज तूपळ,संदीप देसाई,नाना शिंदे,रुपेश मोळवडे उपस्थित होते.
मान्यवरांनी भाषणातून रक्तदानाचे महत्व आणि फायदे उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.कारण देश संकटात सापडला आहे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे कारण देशात आणि राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. आणि या संकटातून आपल्या सर्वांना बाहेर पडायचे आहे आणि सरकारने जे निर्बंध घातले आहे त्याचे गांभीर्य ओळखून पालन केले पाहिजे असे देखील सांगितले.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने करण्यात आले. व योगेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. आणि योगेश जाधव, अमित घेनंद योगेश मोरे यांनी संयोजन केले.