शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये दापोडी, फुगेवाडी परिसरातील वीज पुरवठा खंडित होणे, वेळी-अवेळी दिवसातून सतत वीज नसणे, अशा विजेच्या अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहे. या सर्व अडचणींची माहिती या परिसरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे यांना मिळाली.
नगरसेविका स्वाती माई काटे यांनी विज महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन सदर अडचणीं दूर करण्याची मागणी केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, प्रभाग क्रमांक 30 मध्ये मागील काही दिवसापासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. काहीवेळा तर रात्रभर वीज येत नाही. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज कोरोना ची परिस्थिती महाभयंकर आहे. अनेक कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत. अशा वेळी वीज खंडित होणे, यामुळे परिस्थिती अवघड होत चालली आहे. प्रभाग क्रमांक 30 मधील दापोडी, फुगेवाडी येथील वीजपुरवठा सुरळीत करावा.
त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत विज महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी सकारात्मकता दाखवीत सध्या पावसाळ्यापूर्वी ची कामे सुरू असल्याने हा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे कारणे दिली. तसेच यापुढे प्रभाग क्रमांक 30 मधील परिसरात सुरळीत वीजपुरवठा होणार असल्याचे सांगितले.