साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, साईराज युवा प्रतिष्ठान, व जय महाराष्ट्र तरुण मंडळ दापोडी यांच्या वतीने सामाजिक उपक्रम
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त साई बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स,साईराज युवा प्रतिष्ठान व जय महाराष्ट्र तरुण मंडळ दापोडी यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या तसेच कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हाच एक महत्त्वाचा उपाय. मास्क वापरणे, सॅनिटायझर चा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, अशा नियमांचे पालन करणे योग्य आहे. या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझर नागरिकांना आवश्यक असल्याने आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी व एक सामाजिक उपक्रम अंतर्गत नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
यावेळी धिरज कांबळे,शाहनवाज शेख अतुल काटे, सूहास वडके, अजय कांबळे,अनुष्का शिंदे, प्रमोद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.