पिंपरी:दिनांक :५मे२०२१ : सायबर सुरक्षेबाबत सर्वांनीच आवश्यक त्या उपाययोजना करून सजगता बाळगली पाहिजे असे आवाहन प्रा. धनंजय भावसार यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे ‘सायबर सुरक्षा’ या विषयावरील वेबिनारमध्ये मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीला विविध प्रकारच्या संप्रेषण (कम्युनिकेशन) प्रणालीबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
सायबर विश्वात वावरताना आपली अमूल्य माहिती सुरक्षित कशी राहिल, यासाठी संगणक प्रणालीमध्ये अँटी व्हायरसची असलेली आवश्यकता, यंत्रणेत वारंवार येणारे अडथळे, अनोळखी फाईल्सचा शिरकाव, सायबर हल्ला याबाबतही प्रा. भावसार यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
Advertisement
विशेषतः ई- कॉमर्सचा वापर करताना फक्त स्वतःचेच डिव्हाईस वापरणे,अवघड पासवर्ड ठेवणे, कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती शेअर न करणे, महत्वाच्या फाईल्सचा बॅक अप ठेवणे आशा उपाययोजनांबाबतही प्रा. भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्यासह अन्य अध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला. वेबिनारचे समन्वयक म्हणून डॉ. पुष्पराज वाघ यांनी काम पाहिले.