शबनम न्यूज / पिंपरी
महानगरपालिकेच्या जम्बो कोव्हिड सेंटर येथील मृत्यूचे प्रमाण वाढत असून २ दिवसापूर्वी दाखल केलेला रूग्ण धास्ती घेऊन त्याची परिस्थिती गंभीर होते. रूग्णांचे मनोबल (Wheel Power) वाढविण्याच्या दृष्टीने जम्बो कोव्हिड सेंटर येथे TV स्क्रीन बसवून त्याठिकाणी भक्तीपर,मनोरंजनपर,सामाजिक सिनेमा दाखविणे त्याचबरोबर रूग्णांना योगासन,प्राणायाम यांसारख्या आसन करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. तसेच वाचणाची आवड असलेल्या रूग्णांना पुस्तके उपलब्ध करून देणे व सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्याबाबतचे निवेदन मा.आयुक्त राजेश पाटील व मा.अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना नगरसेवक राजाभाऊ बनसोडे व पिंपरी युवा सेना विभागसंघटक निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले.
तसेच कोव्हिड सेंटरमध्ये वरीलप्रमाणे अंमलबजावणी केल्यास मृत्यूदर कमी होऊन रूग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.