पुणे, दि. 5 : पुणे विभागातील 10 लाख 65 हजार 545 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 49 हजार 913 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 60 हजार 614 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 23 हजार 754 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 76 हजार 461 रुग्णांपैकी 7 लाख 66 हजार 953 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 95 हजार 923 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.51 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 11 हजार 863 रुग्णांपैकी 86 हजार 654 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 22 हजार 800 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 409 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 8 हजार 275 रुग्णांपैकी 87 हजार 354 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 997 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 924 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 81 हजार 486 रुग्णांपैकी 64 हजार 955 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 102 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 71 हजार 828 रुग्णांपैकी 59 हजार 629 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 792 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 14 हजार 508 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 955, सातारा जिल्ह्यात 1 हजार 985, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 9, सांगली जिल्ह्यात 1 हजार 575 तर कोल्हापूर जिल्ह्यात 984 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 15 हजार 100 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 133, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 260, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 674, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 293 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 740 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 22 लाख 22 हजार 68, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 9 हजार 905, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 32 हजार 847, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 66 हजार 293 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 लाख 70 हजार 135 नागरिकांचा समावेश आहे