शबनम न्यूज / पिंपरी
आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका प्रियांका बारसे यांनी म्हंटले आहे कि ,पिंपरी-चिंचवड शहरात लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून व सरकारी- खाजगी रुग्णालयांना मदतीला घेऊन गृहनिर्माण सोसायट्या त्याचप्रमाणे चाळी व कॉलनी यांमधील एखादे मंदिरांमध्ये कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी.
आपल्या पिंपरी -चिंचवड शहरात कोरोनाची दुसरी लाट धडकी भरवणारी असून त्याची संक्रमण करण्याची गती अधिक आहे आणि त्या दृष्टिकोनातून लसीकरणाचा वेग वाढवणे सुद्धा गरजेचे आहे .
लसीकरण केंद्रे प्रत्येक प्रभागांमध्ये एक किंवा दोन चालू आहेत पण त्या ठिकाणी अद्यापही हवी तेवढी लस मिळत नाही .दोन-दोन चार-चार दिवस लसीकरण केंद्र बंद असते आणि त्यामुळे ज्या वेळी लस उपलब्ध होते त्यावेळी लसीकरण केंद्रावर अतोनात गर्दी होते सोशल डिस्टंसिंग त्याठिकाणी पाळले जात नाही .कधीकधी गोंधळाचे तर कधीकधी संतापाचे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेले असते .अशा वेळी लसीकरण केंद्र आणि तेथील कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण येतो हे लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने लसीकरणाचा वेग वाढविण्याबरोबरच विषाणु संक्रमित करण्याची कारण आपल्याला कमी करावयाची आहेत .त्यासाठीच मी आपणाला विनंती करते की सोसायट्याच्या पार्किंग मध्ये किंवा मंदिरांमध्ये शाळांमध्ये जर लसीकरण चालू केले तर ही अतिरिक्त होणारी गर्दी कमी होईल आणि लसीकरण ही वेगाने होईल .
त्याचप्रमाणे जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये जेव्हा शाळा चालू होतील त्यावेळी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना जशी टी टी ची लस शाळेमध्ये येऊन आपला महानगरपालिकेचा स्टाफ देतो त्याच पद्धतीने किंवा त्याच धर्तीवर आपण पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्या त्या शाळेत जाऊन जर लस दिली गेली तर विद्यार्थी या विषाणू पासून सुरक्षित राहतील .
पुढील काळात या सर्व गोष्टींचे नियोजन करणे आपल्याला गरजेचे आहे त्या दृष्टीकोनातून आपण विचार करण्याची वेळ आली आहे असे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी मत व्यक्त केले आहे