शबनम न्यूज / पुणे
पुणे विभागातील 10 लाख 79 हजार 629 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 66 हजार 802 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 63 हजार 118 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 24 हजार 55 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.22 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 85 हजार 592 रुग्णांपैकी 7 लाख 75 हजार 250 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 96 हजार 608 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.54 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 14 हजार 242 रुग्णांपैकी 88 हजार 690 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 140 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 412 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 10 हजार 268 रुग्णांपैकी 88 हजार 942 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 350 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 976 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 83 हजार 319 रुग्णांपैकी 66 हजार 100 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 746 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 73 हजार 381 रुग्णांपैकी 60 हजार 647 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 274 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 16 हजार 889 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 131, सातारा जिल्ह्यात 2 हजार 379, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 993, सांगली जिल्ह्यात 1 हजार 833 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 553 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 14 हजार 84 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 297, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 36, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 588, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 145 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 18 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 22 लाख 83 हजार 494, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 18 हजार 619, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 54 हजार 368, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 72 हजार 324 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 लाख 86 हजार 260 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 71 लाख 53 हजार 737 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 12 लाख 66 हजार 802 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.