शबनम न्यूज / मावळ
जिल्हा परिषद पुणे व कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते मागच्या महिन्यात ऍग्रो आंबूलन्स देण्यात आली होती याचा उपयोग खेड, मावळ ,मुळशी, शिरूर ,जुन्नर ,आंबेगाव या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे,
त्या अनुषंगाने आज खेड तालुक्यातील येलवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे यांच्या शुभहस्ते व सभापती कृषी व पशुसंवर्धन मा.बाबुराव आप्पा वायकर यांच्या उपस्थितीमध्ये माती परीक्षण व पाणी परिक्षण या योजनेचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच-हिराबाई बोत्रे,मा.विश्वस्त-रामभाऊ मोरे,प्रल्हाद आप्पा मोरे,मा.जि.प.स-माऊली काळोखे,चेअरमन-अभिमन्यू काळोखे,तुकाराम बोत्रे,दशरथ बोत्रे,प्रकाश बोत्रे,अर्जुन मोरे,राशीद धोंडफोडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते,तसेच जिल्हा कृषी अधिकारी-पिंगट साहेब,कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शाश्रज्ञ-योगेश यादव,खेड तालुका कृषी अधिकारी-ढवळे साहेब,कृषी अधिकारी मावळ-संताजी जाधव,मंडळ कृषी अधिकारी-नेरकर साहेब इत्यादी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
तसेच कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शाश्रज्ञ योगेश यादव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षण,पानदेठ परीक्षण माहिती करून दिली,व शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका, खत व्यवस्थापन, पाण्याचा पूर्ण अहवाल हे प्रतिनमुन्यामध्ये देण्यात येईल अशी माहिती देखील दिली. जि.प.अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे यांनी खेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ह्या माती परीक्षण पानदेठ परीक्षण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.