शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील एका खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाला मात्र पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला याबाबत स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनी मध्यस्थी करून पोलिसांना कळविले यानंतर रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले
गंगा नगर प्राधिकरण येथील योगिता गवते वय 58 यांना पंधरा दिवसापूर्वी खासगी रुग्णालयात दाखल केले होते बुधवारी दिनांक 5 रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला रुग्णालयाने त्यांचे पाच लाख 70 हजार बिल केले त्यांचे नातेवाईक त्यांनी यातील तीन लाख 70 हजार भरले नुकताच महिलेच्या पतीचा देखील कोरोना मुळे मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आधीच लाखो रुपयांचा खर्च झाला होता त्यात अजून एवढी रक्कम भरताना रुग्णालयाकडे बिल कमी करण्याची विनंती केली होती. मात्र रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला या बाबत नातेवाईक व रुग्णालय प्रशासन यांच्यात वादावादी झाली.
नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांना हा प्रकार सांगितला त्यावेळी नगरसेवक शैलेश मोरे यांनी पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांचे मदतीने रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून मृतदेह ताब्यात द्यायला लावले रुग्णालयाने तीन लाखांची पॉलिसी असल्याने एक लाख माफ करून पंचवीस हजार रोख आणि 75 हजार चेक घेतला आणि मृतदेह ताब्यात दिला