शबनम न्यूज / वृत्तसंस्था
भारतात मान्सूनचे आगमन वेळेवर एक जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे देशभरात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे याच कालावधीत मान्सूनच्या आगमनाबरोबरच हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात येतो हवामान खात्याचा प्राथमिक अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून एक जून पर्यंत धडकणार आहे महाराष्ट्रातही मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे सध्या कडक उन्हाच्या तडाक्याने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. घामाच्या धारांनी कंटाळलेल्या महाराष्ट्रासाठी आणि देशातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी आहे.
Advertisement