मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या कोरोना च्या केसेस हाताळण्याचे कार्यक्षमतेचे नुकतेच कौतुक केले याची दखल घेत गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या मुंबई पॅटर्न चे कौतुक करीत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या महापालिका आयुक्तांनी हा पॅटर्न राबवावा अशी सूचना केली जेथे अधिक रुग्ण आहेत तेथे लॉक डाउन करण्याची सूचना सरकारला करा. पुण्यातही लॉक डाउन करण्याचा विचार करा अशी सूचना न्यायालयाने केली. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी अन्य पालिका आयुक्तांची विसी द्वारे बैठक घेऊन मुंबईत किती खाटा उपलब्ध आहेत आणि रुग्णांचे व्यवस्थापन कसे केले जाऊ शकते याबाबत माहिती द्यावी तसेच त्यांनी कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणते मॉडेल वापरले आणि संबंधित महापालिका त्यांच्या कार्यक्षेत्रात त्याचा कसा वापर करू शकतात याबाबत मार्गदर्शन करावे असे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे