शबनम न्यूज / वृत्तसंस्था
आयपीएल मधील काही खेळाडू आणि स्टाफ कोरोना पॉझिटिव आढळल्यानंतर २१ सामने झाल्यानंतर आयपीएलचे चौदावे पर्व मंगळवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले देशात कोरोना ने थैमान घातले असताना आयपीएल चे आयोजन कसे केले गेले ? अशी टीका बीसीसीआयवर झाली या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोर्डाची भूमिका स्पष्ट केली.
आयपीएल आयोजन भारतात करून आम्ही कुठलीही चूक केलेली नाही असे सौरभ गांगुली यांनी सांगितले आयपीएलसाठी आलेल्या विदेशी खेळाडूंची संपूर्ण काळजी बीसीसीआय घेत असल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
आयपीएलचे उर्वरित ३१ सामने स्थगित झाले हे सामने ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सुरू करण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिल्यामुळे आयोजन, कोरोना चा प्रादुर्भाव आणि खेळाडूचे आरोग्य या मुद्द्यांवर चर्चा होत आहे योग्य कालावधी पाहूनच उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यात येतील असे सौरव गांगुली यांनी सांगितले आहे