शबनम न्यूज / पिंपरी
भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे माजी सरचिटणीस प्रमोद निसळ यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भाजप शहर शोकाकुल झाले त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता भाजपाचे सर्वच अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल मीडियाद्वारे दिवंगत प्रमोद निसळ यांना शोकाकुल मनाने श्रद्धांजली दिलीजात आहे; त्यांच्या आठवणी तील घटना चे फोटो मोठ्याप्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले भाजप चे जुने जेष्ठ पदाधिकारी प्रमोद निसळ यांच्या आठवणी सोशल मीडियावर ताज्या होताना दिसत आहे .काल कोरोना च्या संसर्गामुळे प्रमोद निसळ यांचे निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली यानंतर त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता सोशल मीडियावर सर्वस्तरातून त्यांच्या आठवणी भाजप कार्यकर्ते वतीने ताज्या होताना दिसत आहे.शहर भाजप वतीने शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप , महापौर उषा उर्फ माई ढोरे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, अमित गोरखे, संजीवनी पांडे, माजी महापौर राहुल जाधव , नगरसेवक शीतल शिंदे , माजी नगर सेवक राजू दुर्गे असे अनेक मान्यवरांसहित सर्वच कार्यकर्ते , पदाधीकारी यांनी दिवंगत प्रमोद निसळ यांना श्रद्धांजली दिली