भोसरी जंबो कोविड सेंटर उभारण्यासाठी टाळता येणारा खर्च वाचण्यासाठी बारसे कुटुंबाने घेतला निर्णय
शबनम न्यूज / पिंपरी
सध्या पिंपरी-चिंचवड शहरात नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पिचिमनपा कोट्यावधींचा खर्च करणार आहे.
नागरिकांचा कररूपाने मिळणारा पैसा अशा पद्धतीने वाया घालवण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत उभ्या असलेल्या अद्ययावत इमारती, महानगरपालिकेच्या शाळा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्या इमारती त्यांच्या परवानगीने जर वापरल्या गेल्या आणि फक्त वैद्यकीय यंत्रणेवर होणारा खर्च करण्यात आला तर निश्चितच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे .
आमची बारसे कुटुंबाची स्वतःची गवळीनगर प्रभागात चार मजली अद्ययावत शाळा इमारत असून ही कोविड केअर सेंटर तसेच ऑक्सिजन बेडसाठी सुद्धा वापरण्यास सुयोग्य अशी आहे .
24 तास थ्री फेज लाईट
24 तास बोअरचे पाणी उपलब्ध आहे.शाळेच्या गेटच्या बाहेर 70 फुटी मोठा रस्ता असुन पार्किंगची समस्या येथे राहणार नाही
तसे पत्र आयुक्त पिंपरी-चिंचवड मनपा यांना दिलेले आहे.
यापूर्वी सुद्धा संत निरंकारी या सेवाभावी संस्थेने स्वतःची सुसज्ज इमारत वापरावयास देण्यास इच्छा दर्शवली होती शिवाय आपल्या भोसरी परिसरामध्ये अनेक महानगरपालिकेच्या मोठमोठ्या इमारती आहेत निश्चितच आयुक्तांनी हा आवाजवी खर्च करण्यापेक्षा नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर असताना वैद्यकीय यंत्रणेवर अधिक खर्च केला तर जास्त बरे होईल असे मत प्रियांका बारसे नगरसेविका यांनी व्यक्त केले आहे.