पिंपरी (दि. 7 मे 2021) हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील नागरिकांचे आणि शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांच्या विषयी काही समाजकंटक सोशल मिडीयामध्ये आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करीत आहेत. त्यापैकी पिंपरी परिसरातील सचिन काळे ह्या व्यक्तीने काही आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला असल्याचे पुरावे आहेत. या समाजकंटकावर कायदेशीर कडक कारवाई करावी अन्यथा अशा व्यक्तींना शिवसेना स्टाईलने अद्दल घडवू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना शहर शिवसेनेच्या वतीने ॲड. भोसले यांनी गुरुवारी पत्र दिले. यावेळी शहर संघटक हरेश नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, प्रदिप दळवी, शाखा प्रमुख नरसिंग माने तसेच गणेश आहेर, पंकज दिक्षीत, दिपक बरकडे, सचिन झरेकर, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.
या पत्रात ॲड. भोसले यांनी म्हटले आहे की, सोशल मिडीयाचा अशा प्रकारे गैरवापर करुन समाजात अशांतता निर्माण करणा-यांवर सायबर क्राईम ॲक्ट अंतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे. मा. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत अशा प्रकारे आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणा-यांचे वेळप्रसंगी शिवसैनिक तोंड काळे करतील आणि अद्दल घडवतील. तसेच सचिन काळे यांने ताबडतोब शिवसेनेची माफी मागावी अशीही मागणी ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे.
————————–