शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात शहरातील सर्वच प्रभागात एक ऐवजी दोन लसीकरण केंद्र सुरु करा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.दिलेल्या निवेदन मध्ये नमूद केले आहे, आपल्या शहराची लोकसंख्या पहाता जलद गतीने लसीकरण होणे गरजेचे आहे. सध्या शहरातील प्रत्येक प्रभागात एक लसीकरण केंद्र आहे. १ मे पासून १८ वर्षे ते ४४ वर्षपर्यंतच्या नागरिकाना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. म्हणून शहरातील प्रत्येक प्रभागात दोन लसीकरण केंद्रावर सुरु करावेत. एका केंद्रावर १८ ते ४४ वर्षे व ४५ वर्षापुढील नागरिकाना वेगवेगळे केंद्र सुरु करावेत.
जेणेकरून शहरातील लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व सर्वांनाच लस व्यवस्थित मिळणार असल्याने महापालिका यंत्रणेवर कामाचा परिणाम होणार नाही.अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी केली आहे.