पुणे, दि. 7 : पुणे विभागातील 10 लाख 91 हजार 462 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 84 हजार 670 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 68 हजार 839 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 24 हजार 369 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 95 हजार 227 रुग्णांपैकी 7 लाख 81 हजार 539 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 99 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.30 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 16 हजार 417 रुग्ण आहेत. तर 90 हजार 616 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 363 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 12 हजार 385 रुग्णांपैकी 90 हजार 637 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 719 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 85 हजार 647 रुग्णांपैकी 67 हजार 234 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 902 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 74 हजार 994 रुग्णांपैकी 61 हजार 436 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 44 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 868 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 635, सातारा जिल्ह्यात 2 हजार 175, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 117, सांगली जिल्ह्यात 2 हजार 328 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 613 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 11 हजार 833 आहे. पुणे जिल्हयामध्ये 6 हजार 289, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 926, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 695, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 134 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 789 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 23 लाख 6 हजार 451, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 27 हजार 785, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 72 हजार 903, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 86 हजार 106 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 10 लाख 5 हजार 938 नागरिकांचा समावेश आहे.