शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील विकास नगर, किवळे, मामुर्डी भागातील सर्व अंतर्गत रस्ते एक ते दीड फूट खोदकाम करूनच डांबरीकरण करावे अशी मागणी ब प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस यांनी ब प्रभाग अधिकारी यांच्याकडे केली आहे.
विकास नगर व इतर भागातील अंतर्गत लहान-लहान कॉलनी मधील रस्ते हे एक ते दीड फूट खोदकाम करूनच डांबरीकरण करावे कारण वर्षानुवर्षे त्याच रोडवर फक्त डांबरीकरण करण्यात येते या प्रभागातील रस्त्यांची उंची जास्त असल्याने पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील पाणी हे सोसायटी व कॉलनी मधील घरांमध्ये शिरते घराची उंची रोडच्या उंचीपेक्षा कमी असल्याने रोडवर चे पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते तरी पावसाळ्यापूर्वी करावयाचे कामांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करताना सदर रस्ते एक ते दीड फूट खोदून त्या रस्त्यांची उंची कमी करून नंतरच डांबरीकरण करावे अशी मागणी राजेंद्र यांनी ब प्रभाग अधिकारी यांच्याकडे केली आहे