ॲड. फारुक अन्वरअली शेख यांच्या युक्तिवादामुळे मिळाला जामीन
शबनम न्यूज / पुणे
पुणे येथील विशेष सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरणातील एका आरोपीला जामीन मंजूर केला तपास करीत असताना पोलिसांकडून काही त्रुटी राहतात तर परिस्थितीजन्य पुराव्यामुळे त्यांना कारवाई करणे भाग पडते परंतु या गोष्टी काही निरपराध, निर्दोष व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरतात असे एखादे प्रकरण न्यायालयासमोर सादर झाल्यानंतर आरोपीची बाजू मांडताना वकिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते वकिलांनी केलेला युक्तिवाद यामुळे अशा प्रकरणांना एक वेगळेच वळण मिळते अशा त्रुटी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याने योग्य तो तपास करण्याचे आदेश न्यायालय संबंधित अधिकारी यांना देत असतात यामुळे अशा गंभीर प्रकरणाला कलाटणी मिळून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला नवी दिशा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
वाकड पोलिस स्टेशन मध्ये असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे एका सतरा वर्षाच्या फिर्यादीने आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती सदर प्रकरणात पीडित मुलीचे वय सतरा असल्याने पोलिसांनी पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला व आरोपीस अटक केली सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून अजामीनपात्र आहे सदर गुन्ह्यात जन्मठेप व फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरच्या गुन्ह्यातील प्रकरणातील आरोपी किरण चंदनशिवे याचे वकीलपत्र ॲड. फारुक अन्वरअली शेख यांनी स्वीकारले या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अभ्यास केल्यानंतर ॲड. फारूक अन्वरअली शेख यांनी आरोपीची बाजू मेहरबान न्यायालय समोर मंडळी न्यायालय समोर बाजू मांडताना ॲड. फारूक अन्वरअली शेख यांनी सदरील गुन्ह्यात / प्रकरणात फिर्यादी आणि आरोपी यांचे प्रेम प्रकरण असून त्यात कोणत्याही प्रकारची पिढितावर बलात्कार झाल्याची घटना उघड झाली नाही .अशी बाजू मांडली सदर प्रकरणात आरोपीचा जामीन नामंजूर झाला तर आरोपी सराईत गुन्हेगार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा युक्तिवाद ॲड. फारूक अन्वरअली शेख यांनी मांडला सदर प्रकरणात तपास पूर्ण झाला असून आरोपीविरुद्ध कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नसल्याचा महत्त्वाचा मुद्दा ऍडव्होकेट फारूक अन्वरअली शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला मेहरबान कोर्टाने दोन्ही बाजू तपासून ॲड. फारूक अन्वरअली शेख यांचा आरोपीच्या बाजूने केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून व आरोपी किरण चंदनशिवे याला सदरील गुन्ह्याशी काही संबंध नाही असे सांगत सबळ पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला .