पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे महापालिका प्रशासनाला निवेदने
– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचाही पाठपुरावा
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येणार असून, त्यामध्ये लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण जास्त राहील, असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे पूर्वकाळजी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरात मदर चाईल्ड कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनीही कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी, यासाठी महापालिकेतील भाजपाचे पदाधिकारी आग्रही आहेत.
याबाबत महापालिका आमदार लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशात सध्यस्थितीला लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना धोका जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर उभारणार आहे. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये लहान मुलांना आईसोबत कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेता येतील, असे सेंटर उभारण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असलेले बालरोग तज्ञ यांची भरती प्रक्रिया राबवावी. ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच सर्व तयारी करणे उचित ठरणार आहे.
सध्यस्थितीला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी राज्य व केंद्र सरकार आपआपल्या परिने प्रयत्न करीत आहे. पण, १८ वयोगटाखालील मुलांना अद्याप कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. १ ते ९ वर्षांच्या मुलांना विविध लस दिल्या असल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. पण त्या तुलनेत १० ते १८ वयोगटातील मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यांना कोरोना प्रतिबंधक लसही देता येत नाही.
पालकांमध्ये जनजागृती करावी…
महापालिका प्रशासनाने लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास पालकांनी काय काळजी घ्यावी. याबाबत जनजागृती करणे अपेक्षीत आहे. लहान मुलांना सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरीच विलगीकरणात ठेवलास रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे. ज्यामुळे वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील याबाबत सल्ला द्यावा. त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात यावा. या नियंत्रण कक्षात ज्येष्ठ बालरोगतज्ञ व वद्यकिय समुपदेशकांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्काची जबाबदारी देण्यात यावी. लहान मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी पालकांनी काय खबरदारी घ्यावी? लहान मुलांना कोरोनाची झाल्यास काय करावे ? लहान मुलं मास्क वापरत नसल्याने पालकांनी कशी काळजी घ्यावी? या व अशा इतर अनेक मुद्दयांबाबत तज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शनपर सूचना तयार करुन त्याबाबत जनजागृती करावी, अशी मागणीही आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.