शबनम न्यूज / वृत्तसंस्था
अभिनेत्री कंगना रणौतला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कंगनाने करोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. स्वत:चा फोटो शेअर करत तिने ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल करोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/COmVsjTBQ9e/?igshid=r6fqm9q53c89
Advertisement