शबनम न्युज / पुणे
सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या विठ्ठल शेलार यांच्या आईच्या डोक्यात रॉड मारुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहाटे वारजे माळवाडी येथे घडला आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ ही पहाटे घटना घडली आहे.
शाबाई शेलार यांचा मुलगा विठ्ठल अरुण शेलार हे सातारा पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
शाबाई शेलार यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. भाजी मंडईजवळच त्यांचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहून पहाटे साडेपाच वाजता वारजे पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसात लॉकडाऊनच्या काळातच खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या ४ दिवसात संचारबंदी असतानाही खुनाच्या ५ घटना घडल्या आहेत.
प्रतिनिधी
दिलीप सोनकांबळे