पिंपरी-चिंचवड शहरातील पुनवळे येथे वास्तव्यास असणारे रूपाली रामटेककर व अमित रामटेककर यांचा अवघ्या तेरा महिन्याचा मुलगा युवान रामटेककर हा एका असाध्य आजाराने ग्रस्त आहे त्याच्या उपचाराकरिता मदतीचे आवाहन
पिंपरी चिंचवड – युवान अमित रामटेककर हा पिंपरी चिंचवड मधील पुनावळे येथील रहिवासी अमित रामटेककर व रूपाली रामटेककर यांचा एकुलता एक मुलगा युवान याला एस एम ए प्रकार 1 (स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी टाईप १ ) हा दुर्मिळ आजार झाला आहे हा आजार खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायूंना कमकूवत करतो व जसे हे प्रमाण वाढत जाते तस तसे रुग्णाला श्वास घेणे ,चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते व वेळेवर उपचार मिळाले नाही तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.
युवान आता १४ महिन्यांचा आहे आणि त्याला या समस्या सुरू झाल्या आहेत युवान वरती पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे युवांना पुढील दोन महिन्यांमध्ये लस देण्याची गरज आहे दोन महिन्याच्या आत मध्ये लस दिली तर युवान पूर्णपणे ठणठणीत बरा होऊ शकतो
लसीचे नाव zolgensma असे आहे ,ही लस अमेरिके मधून आयात करावी लागणार आहे व या लसीची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करायची ताकद युवान च्या पालकांची नाही ही लस मागविण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे तरी भारतामधील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमांमध्ये पुढे येऊन जास्तीत जास्त मदत करावी अशी अपेक्षा आहे तर आणि तरच युवान हा ठणठणीत बरा होऊ शकतो आपल्या सर्वांच्या मदतीमुळे आपण या लहानग्या युवान ला जीवनदान देऊ शकतो व या लसीच्या मदतीने युवान पूर्णपणे बरा होऊ शकतो युवान च्या पालकांची तळमळ बघता समाजातील तळागाळातून मदत चा ओघ सुरु झाला आहे, आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपापल्यापरीने जितकी होईल तितकी मदत करावी अशी आशा समाज माध्यमातून व्यक्त होत आहे समाजाच्या तळागाळातील लोकांनी पुढे येण्याचे आवाहन आज महाराष्ट्राच्या समोर आहे आणि महाराष्ट्रातील जनता हे आव्हान स्वीकारून युवान ला या आजारातून बाहेर काढेल असा ठाम विश्वास युवान च्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे