शबनम न्यूज
उपजिल्हा रुग्णालय कळंब मधील धक्कादायक प्रकार समोर आला असून रुग्णालयाच्या हलगर्जी पणाने रुग्णांचे मृत्यू होत असल्या चा आरोप करीत स्वाभिमानी विकास मंच महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष शिवदास चिलवंत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे तक्रार केली आहे. ई-मेल द्वारे तक्रार करण्यात आली असून या तक्रारीत खालील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे.
मौजे आथर्डी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या गावातील रहिवाशी असून दिनांक 20/4/2021 रोजी राहुल साधू चिलवंत यांची कोरोना चाचणी ईटकूर तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी केली असता यांचा रिपोर्ट निगेटिव्ह देण्यात आला व 23/4/2021 रोजी राहुल साधू चिलवंत यांना त्रास होवू लागला व परत चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह देण्यात आला दिनांक 24/4/2021 रोजी ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय कळंब या ठिकाणी उपचार घेण्यास दाखल करण्यात आले या ठिकाणी राहुल साधू चिलवंत व त्यांचे काका महादेव विठ्ठल चिलवंत व राहुल यांच्या मातोश्री लक्ष्मी साधू चिलवंत हे तिघे हि एकाच वार्ड मध्ये होते दिनांक 25/4/2021 रोजी दुपारी 12:30 वाजल्या पासून महादेव विठ्ठल चिलवंत यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता हा त्रास बघून राहुल साधू चिलवंत यांनी डॉकटर व नर्स यांना वारंवार ओरडून विनंती करत होते की आमच्या काकांना खुप त्रास होत आहे तुम्ही लवकर काही तरी करा पण तेथील कर्मचाऱ्यांना राहुल साधू चिलवंत यांच्या मोठ्या आवाजात बोलण्याचा राग आला म्हणून स्टाफ ने राहुल साधू चिलवंत हे पेसेंट असतानाही त्यांना दमदाटी केली रात्री 8:00 वाजता राहुल साधू चिलवंत यांना सर्वांबरोबर इंजेक्शन व औषध देण्यात आले त्या नंतर एक तासाने राहुल साधू चिलवंत यांची तबियत अचानक खराब झाली व ते बेशुद्ध होऊन खाली पडले हॉस्पिटल मधिल बाकीचे पेसेंट व कर्मचारी ओरडून ओरडून बोलले कि या पेसेंट चे कोण्ही नातेवाईक आहे का त्या वेळेस मयताची आई पलीकडच्या बेड वर होत्या त्यांनी तिथे जावून हा माझा मुलगा आहे असे सांगितले तसेच डॉकटर व स्टाफ यांना विनंती केली कि पेसेंट ला उचलून वर घेवून ऑक्सिजन लावा परंतू त्यांनी लवकर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच सिटीस्क्यान हे काहीही केले नाही रात्री बरोबर 11:30 वाजता मयताचे नातेवाईक { भाऊ} देविदास महादेव चिलवंत यांना फोन करून कळविले तुमचा पेसेंट खूप सिरीयस आहे तुम्ही ताबडतोब रुग्णालयात या ते त्या ठिकाणी पोहचले असता मयता ची ऑक्सिजन लेवल 11 वर आलेली होती त्यांचे भाऊ देविदास महादेव चिलवंत यांनी विनंती केली कि तुम्ही पम्पिंग करावे व व्हेंटिलेटर लावावे परंतू तेथिल डॉकटर्स व स्टाफ यांनी काहीही ऐकून घेतले नाही व 12:05 मिंटानी मयत घोषित केले , त्या नंतर 26/4/2021 रोजी दुपारी 12:30 दरम्यान महादेव विठ्ठल चिलवंत यांची प्रकुर्ती पुन्हां बिघडली असता त्यांना ही व्हेंटिलेटर न लावता कुठलेही उपाय केले नाहीत त्या मुळे त्यांचा ही दुपारी 4:00 वाजता मृत्यू झाला
या संम्पुर्ण घटनेच्या प्रतेक्षदर्शी साक्षीदार मयताच्या आई श्रीमती लक्ष्मी साधू चिलवंत आहेत, हॉस्पिटल च्या हलगर्जी पणामुळे शेवटी श्रीमती लक्ष्मी साधू चिलवंत यांना प्रायव्हेट ऍम्ब्युलन्स करून पुण्यात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना विनंती आहे की या हॉस्पिटल मध्ये रोज आठ ते दहा पेसेंट केवळ हॉस्पिटल च्या हलगर्जी पणामुळे दगावत आहेत. मा. दादांना विनंती आहे आपण या प्रकरणात लक्ष्य घालून 1} राहुल साधू चिलवंत व 2} महादेव विठ्ठल चिलवंत आणि आतापर्यंत मयत झालेले पेसेंट यांना न्याय मिळवून घ्यावा व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी
शिवदास चिलवंत
संस्थापक अध्यक्ष
स्वाभिमान विकास मंच संघटना महाराष्ट्र,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड पुणे
मो. 8407911166