स्पर्श हॉस्पिटल अँटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल चालवत असताना सदर व्यवस्थापनाबाबत पिंपरी चिंचवड मनपाकडे खुप तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याची दखल महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलेली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी सदरचे रुग्णालय मनपा अंतर्गत अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच स्पर्श हॉस्पिटल यांच्या गलथान कारभाराबाबत आपणास काळ्या यादीत टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस व याबाबत आपणावरती फौजदारी गुन्हे का दाखल करण्यात येवू नये याबाबत खुलासा चार दिवसात सादर करणेस सांगितलेला आहे.
ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या संस्थेत बेडसाठी लाख रुपये लाटणाऱ्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार कऱणाऱ्या स्पर्श हेल्थकेअर संस्थेला महापालिकेने मोठा दणका दिला. स्पर्श कडून सर्व काम काढून घेण्यात आले आणि त्यांचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.
स्पर्शचे हॉस्पिटल व्यवस्थापन निकृष्ट गुणवत्तेचे असल्याचा ठपका ठेवत आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श चालवीत असलेले ऑटो क्लस्टर हॉस्पिटल डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह तत्काळ प्रभावाने आजपासून अधिग्रहित केले. तसेच स्पर्शला काळ्या यादीत का टाकू नये, फौजदारी कारवाई का करू नये, अशा अशयाची कारणे दाखवा नोटीस बजावत चार दिवसांत खुलासा मागविला आहे.
रुग्णांच्या वैद्यकिय सेवेसाठी डॉ.अभयचंद्र दादेवार व त्यांचे सोबत पाच डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले असून सद्यस्थितीमध्ये असणारे सर्व रुग्णसेवक व तेथील संपूर्ण व्यवस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. श्री.उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त (३) हे समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत.