पुणे : बेरोजगारीला कंटाळून एकाने पत्नी व एक वर्षाच्या मुलाचा गळा सुरीने कापून खून करत स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात हा प्रकार घडला आहे.
प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय 28), मुलगा शिवतेज (वय 1 वर्ष) असे खून झालेल्या मायलेकाची नावे आहेत. तर हनुमंत शिंदे (वय 38) याने स्वतः खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हे मिळेल ते कामे करत. कदमवॉकवस्तीत ते कुटुंबासोबत राहत होते. दरम्यान, त्याला सध्या काही कामधंदा मिळत नव्हता.
त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होता. त्याची आर्थिक अडचण सुरू होती. त्यामुळे तो नैराश्यात होता.
यातुनच त्याने रविवारी पत्नी प्रज्ञा व मुलाचा गळा सुरीने कापून त्यांचा खून केला. त्यानंतर स्वतः पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा सर्व प्रकार हनुमंत याचे वडील दुर्याप्पा शिंदे यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडगे हे करत आहेत..