शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
नेहरुनगर येथील जम्बों कोविड सेंटर येथे रुग्णांना मोबाईल वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी च्या नगरसेविका मंगला कदम यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कडे केली आहे
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि पिंपरी चिंचवड शहरात दिवसें दिवस कोरोनाचा प्रकोप वाढत चाललेला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून कोरोना बाधित रुग्णांसाठी मनपाची व खाजगी रुग्णांलये पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच चिंचवड स्टेशन येथील अँटो क्लस्टर व नेहरुनगर येथील जम्बों कोविड सेंटरसुध्दा चालविले जात आहे. जम्बों कोविड सेंटर येथे कोरोना बाधित रुग्ण दाखल करुन घेताना त्या रुग्णांकडील मोबाईल काढून घेतला जातो. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे त्या रुग्णांची देखभाल करण्यास नातेवाईकांना मज्जाव केला जातो. तो रुग्ण एकटाच त्या रुग्णांलयात असतो व नातेवाईक रुग्णांलयाच्या बाहेर बसुन असतात. त्यामुळे रुग्णांवर काय उपचार चालू आहेत व तो रुग्ण कसा आहे हे नातेवाईकांना समजत नाही. मागील वर्षापासून कोरोनाची नागरीकांमध्ये दशहत बसली आहे, आता दुस-या लाटेमध्येतर संसर्गाचा दर व मृत्यूदर वाढलेला आहे त्यामुळे नागरीकांमध्ये कोरोनाबाबत प्रचंड भिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात रुग्ण एकटाच असल्यामुळे सोबत मोबाईलही नसल्यामुळे त्या रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होते. तो नातेवाईकांशी संवाद साधू शकत नाही मानसिकरीत्या धीर गमावू लागतो. त्यामुळे रुग्णांकडे मोबाईल असेल तर तो नातेवाईकांशी संवाद साधू शकतो अथवा नातेवाईक त्यांच्याशी संवाद साधू शकतात त्याला मानसिक आधार देऊ शकतात. मानसिक आधार मिळाल्यामुळे तो कोरोनामधून लवकर बाहेर पडू शकतो.
] जम्बों कोविड सेंटर, नेहरुनगर येथे कोरोना रुग्णांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात यावी. मोबाईलव्दारे नातेवाईकांशी संबाद साधल्यामुळे रुग्णास एकटे वाटणार नाही व मानसिकदृष्टया समक्ष राहून कोरोनातून लवकर बाहेर पडण्यास मदत होईल. असे नगरसेविका मंगला कदम यांनी नमूद केले आहे.