शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड मनपा ने स्वखर्चातून शहरवासीयांना मोफत लस पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी चे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी मनपा आयुक्तांना केली आहे, पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला महानगरपालिकेच्या खर्चातून लस द्यावी अन्यथा नागरिकांच्या जीवासाठी खर्च करण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत म्हणून महानगरपालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी. असे हि निवेदन द्वारे सांगितले आहे
तसेच भारत सरकार व महाराष्ट्र शासन तसेच देशातील अन्य राज्यांना कोरूना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार दुजाभाव करीत असून ज्यावेळी लस शोधण्यात विविध संस्थांना यश आले त्यावेळी मात्र केंद्र सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत लस देण्यात येईल असे जाहीर केले होते हे आम्ही भारतीय म्हणून विसरलो नाहीत.
तथापि गेल्या आठवड्यापासून भारत सरकार व विविध राज्य शासन यांनी लसी खरेदी करणे बाबत गोंधळ दिसून आहे .त्यामुळे ज्या शोध झाला त्यावेळी एक भारतीय म्हणून जे ऐकले होते ते पण खोटे होते याचे दुःख वाटते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव आशिया खंडात श्रीमंतीच्या बाबतीत नावाजलेले आहे आणि आजही महानगरपालिकेकडे मुबलक पैसे आहेत. नुकताच महानगरपालिकेचा जवळपास 7000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजुरी झाला आहे . गेल्या वर्षभरामध्ये कोरोना सारख्या महामारी साठी महानगरपालिकेने आज पर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेला नाही आणि तो नागरिकांच्या जीवासाठी अर्थसंकल्पाच्या दहा टक्के सुद्धा नाही. गेल्या 4 वर्षात तर मोठ्या प्रकल्पांचे आकडे पाहिले तर सर्वसामान्यांना त्या आकड्यातील कोटींचे शून्य किती आहेत हे सुध्दा मोजता सुद्धा येणार नाहीत. आता मात्र त्याच सर्वसामान्यांच्या जीवावर आलेली वेळ आहे त्यामुळे याच श्रीमंत महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आज रोजी आहे तसे मोफत केले पाहिजे.
महानगरपालिकेमध्ये जवळपास 3.50 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अगदी 30 लाख लोकसंख्या अंदाजे गृहित धरली तरीही महानगरपालिका 25-30 कोटी रुपयांकडे बघणार नाही व त्या आर्थिक परिस्थितीची महानगरपालिका आहे असा आम्हाला आज तरी विश्वास आहे. महानगरपालिकेने लसीकरणाबाबत केंद्रशासन , महाराष्ट्र शासन यांचा काहीही निर्णय होवो त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न ढकलता आपल्या शहरातील नागरिकांची जबाबदारी आपली सुध्दा आहे हे समजून प्रत्येक नागरिकाला तातडीने खरेदी करून घेण्याची परवानगी केंद्र शासनाने कडून घेऊन लसीकरणाची उपलब्धता करून घ्यावी व दोन महिन्यात शहराचे 100% लसीकरण करून घ्यावे म्हणून या पत्राद्वारे मागणी करीत आहे.
आपल्या महानगरपालिकेची परिस्थिती नागरिकांच्या आरोग्यसाठी व त्यांच्या जीवासाठी 25-30 कोटी रुपये खर्च करण्याची नसेल, तर मात्र महानगरपालिकेच्या आजच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या जीवासाठी आम्ही काहीच खर्च करू शकत नाही आमची परिस्थिती तशी राहिली नाही म्हणून दिवाळखोरी जाहीर करावी असे पत्राद्वारे आवाहन करीत असल्याचे प्रशांत शितोळे यांनी सांगितले आहे.