शबनम न्यूज / मावळ
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून व PWD च्या फंडातून श्री क्षेत्र देहूतील मधील संत तुकाराम सोसायटी व विट्ठलवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाले.आमदार सुनील शेळके श्री. क्षेत्र देहूच्या विकासाकरिता सदैव तत्पर असतात त्यांच्याच प्रयत्नातून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना जालिंदर काळोखे यांनी सर्व सभासदांचे कौतुक केले आणि मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत पूर्वीची लोकवस्ती आणि आत्ताची लोकवस्ती यातील फरक त्यांनी विषेद केला आणि वाढत्या नागरिकिकरणाचे कौतुक करून त्यांनी सर्वांना या मातीशी समरस होण्याचे आवाहन केले.अमित घेनंद यांनी अन्य समस्या सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कटिबध्द राहू अशी ग्वाही दिली.सुनीता टिळेकर यांनी देखील विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.
या उद्घाटन प्रसंगी प्रकाश भाऊ हगवणे(अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देहू), जालिंदर महाराज काळोखे(संत सेवक), अभिमन्यु काळोखे(चेअरमन) सुनिल हगवणे (शिवसेना शहरप्रमुख)पूनम काळोखे(सरपंच), शेखर परंडवाल (ओबीसी सेल उपाध्यक्ष) बाळासाहेब काळोखे(मा. ग्रा. प. सदस्य), कांतीलाल काळोखे (मा.सरपंच), सुनिता टिळेकर (मा.सरपंच) योगेश जाधव(उपाध्यक्ष कामगार सेल महाराष्ट्र) प्रदीप काळोखे (कृषी विभाग) योगेश परंडवाल (मा.युवक अध्यक्ष) योगेश मोरे (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) अमित घेनंद (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया ),विशाल काळोखे (युवा नेते),विशाल झेंडे, प्रशांत बेंडभर,संदीप गार्डे,हरीश राठोड, सचिन बाबर, निलेश पाटील,दत्तात्रय पाटील, संतोष खंडागळे, विठ्ठल बाविस्कर, पांडुरंग कुंभार,मोहन यादव, दत्ता यादव,संतोष जाधव, बापूसाहेब बनसोडे, दिलीप सिंग राजपूत, नारायण एडके, राहुल जगताप, कुलदीप जगताप , अप्पासाहेब निकम, संत तुकाराम सोसायटी आणि देहू शहर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…