शबनम न्युज / मुंबई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यांनी दिली आहे.
केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय संस्थांचा वापर करून राजकारण करत असल्याचे स्पष्ट आहे. त्याच पद्धतीने ईडीने गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा राजकीय हेतूने, आघाडी सरकारला व पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे असे सांगतानाच कायदेशीर बाबींनुसार तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
Advertisement