शबनम न्यूज / पुणे
covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. त्यांनी आपल्या या खालील प्रमाणे मागण्यांसंदर्भात उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
सर्वसामान्य जनतेचे किमान दोन महिन्याचे लॉकडाऊन केल्यापासून गृह कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे.
बँकेकडून व खाजगी फायनान्स गृहकर्जाची होणारी वसुली तसेच वाहन कर्जाची वसुली सुद्धा थांबविण्यात यावी.
फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंट कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
शासनाचे आदेश धड्कावून लावणाऱ्या खाजगी फायनान्स व बँकांचे व्यवसाय परवाने रद्द करावेत.
प्रत्येक रुग्णालयांमध्ये covid-19 रुग्णांच्या कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व त्याचे थेट प्रक्षेपण रुग्णांच्या नातेवाइकांना हॉस्पिटलच्या बाहेर दाखविण्यात यावे.
पोलिस प्रशासनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ड्युटीची वेळ ही फक्त आठ तासच करण्यात यावी.
पोलीस प्रशासनाकडून जे सर्व काय सर्वसामान्य नागरिकांना मारहाण होते ती त्वरित थांबवावी व त्याचे जे व्हिडिओ व्हाइरल केले जातात ते सुद्धा त्वरित बंद करण्यात यावे. (संविधानाच्या विरोधात आहे.)
सर्व कंपन्या व व्यापारी वर्गाचे जीएसटी माफ करण्यात यावी. (लॉकडाउनच्या काळापासूनचे)
सर्व कंपन्या व व्यापारी वर्गाचे भाडे तत्त्वावर असणारे निम्मे भाडे माफ करण्यात यावे. (लॉकडाउनच्या काळापासूनचे)
अशा महत्वपूर्ण मागण्यांसाठी प्रदीप नाईक 13 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषण करणार आहेत.