- सर्वसामान्यांपासून राजकारणी खेळाडू, सेलिब्रिटी पर्यंत सर्वांची वेदिका ला साथ !
- वेदिकासाठी ७० दिवसात जमा झाले तब्बल ११ कोटी उर्वरित ५ कोटी रुपये उभारण्यासाठी जनतेला आवाहन!
- जर आपण सर्वजण एकत्र आलो तर वेदिकाला नक्कीच वाचवू शकतो …!!
- तीरा कामत नंतर महाराष्ट्राची ही दुसरी मुलगी आहे जीला भारता मधून तसेच भारताच्या बाहेरून प्रचंड मोठी मदत केली गेली आहे.
- वेदिका च्या आई वडिलांनी मानले जनतेचे आभार!
- उर्वरित ५ कोटी मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरूच
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
वेदिका सौरभ शिंदे हि अवघ्या १० महिन्यांची चिमुरडी Spinal Muscular Atrophy Type 1 (SMA) ह्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च सुमारे २२ कोटी इतका आहे. केंद्र व राज्य शासनाने औषधावरील कर माफ केले तरीही सुमारे सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वेदिकाला या आजाराचे निदान झाल्यानंतर आजपर्यंत जवळपास ७० दिवसात विविध दात्यांकडून ११ (अकरा) कोटी रुपयांचा निधी उभारला गेला आहे. वेदिका ला १६ कोटी रुपये किमतीची झोलगेन्स्मा (Zolgensma) हि लस द्यावी लागणार आहे.
वेदिकाचे वडील सौरभ शिंदे आणि आई स्नेहा शिंदे, नातेवाईक व त्यांचा मित्र परिवार आपल्या वेदिकाला लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी अत्यंत कष्ट घेत आहेत. जास्तीत जास्त दात्यांना स्वतः जाऊन भेटत आहेत. तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही महिन्यापूर्वी “तीरा कामत” हि चिमुरडी या आजाराने ग्रस्त होती त्यावेळी समाजातील अनेक दात्यांनी आपापल्या परीने मदत करत तीरा कामतच्या औषधासाठी निधी उभा केला होता.
आता हेच आव्हान शिंदे कुटुंबापुढे उभे राहिले आहे. वेदिकाचे डॉक्टर संदीप पाटील यांच्या महणण्या नुसार आता जेवढ्या लवकर ही ट्रीटमेंट तिला देता येईल तेवढी लवकर वेदिका या आजारातून बरी होईल.
म्हणून वेदिका च्या आई वडिलांनी समाजातील सर्व तळागाळातील दात्यांना कळकळीची विनंती केली आहे कि, वेदिका शिंदे या चिमुरडीच्या उपचारासाठी लवकरात लवकर आपापल्या परीने जास्तीत जास्त आर्थिक सहयोग करावा.
गुजरात मधील अवघ्या ४ महिन्याच्या धैर्यराज सिंह राठोड ला देखील गेल्याच आठवड्यात SMA TYPE – 1 साठी लागणारे इंजेक्शन दिले गेले आहे गुजरात च्या जनतेने १६ कोटी रुपये धैर्य राज ला जमा करून दिले. गुजरात जर हे करू शकतो तर महाराष्ट्र निश्चितच वेदिका ला बरे केल्याशिवाय राहणार नाही अशा भावना वेदिका च्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.
वेदिका ला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर तसेच लिंक वर क्लिक करून मदत करता येईल.
Payment Mode –
1) Google Pay/ Phone pay/ Paytm – 9922098885
2) Donation Link –
https://milaap.org/fundraisers/support-vedika-shinde