शबनम न्युज / आळंदी
आजच्या या कोरोनामहामारीच्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आळंदी येथील अनाथ आश्रम मध्ये सध्या 40 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना राहण्याची, जेवण, निवासासाठी आणि शिक्षणाची मोफत सुविधा संस्थेच्यावतीने या ठिकाणी करण्यात आले आहे. त्याचबरोबर अशा या रोगाच्या महामारी च्या काळामध्ये सुद्धा मुलं आणि कर्मचारी सुद्धा एकदम तंदुरुस्त व सुरक्षित आहेत.
याची दखल पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक एल गवांदे यांनी घेतली आहे. त्यांच्या समितीमार्फत येथील सर्व कर्मचाऱ्याना कोरोंनायोद्धा म्हणून त्यांनी आपल्या संस्थेच्या वतीने गौरव प्रमाणपत्र देऊन सर्वांना या ठिकाणी गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री स्वामी गणेशानंद महाराज पुणेकर उपस्थित होते तसेच पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक एल गवांदे यांनी आपल्या संस्थेच्या मार्फत याठिकाणी मुलांना आणि कर्मचाऱ्यांना याठिकाणी कोरोना या रोगाविषयी जनजागृती कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केले आहे. तसेच सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते दानशूर, व्यक्तींनी याठिकाणी अनाथ मुलांना मदत करण्याचे आव्हान पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.