शबनम न्युज / मुंबई
मुंबई: वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथे MTNL जंक्शनजवळ मंगळवारी एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. सर्वप्रथम परिसरातील स्थानिकांनी हा मृतदेह पाहिला. त्यांनी लगेच नजीकच्या नियंत्रण कक्षात फोन करुन पोलिसांना याची माहिती दिली. हत्या करण्याआधी महिलेवर बलात्कार झाल्याचं बीकेसी पोलिसांच्या तपासातून समोर आले.
प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, महिलेचा गळा चिरण्यात आला असून तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. हत्या आणि बलात्कारांच्या कलमांखाली अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मृत महिला शरीरविक्रीय करणारी असू शकते तसेच पैशाच्या वादातून महिलेची हत्या झाल्याचा अंदाज बीकेसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी टीम बनवली आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे