शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानरपालिकेने स्पर्श हॉस्पिटलच्या ऑटोक्लस्टर कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी व बाहेरील डॉक्टरांनी कोरोना रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्याप्रकरणी चार डॉक्टरांवर गुन्हे दाखल करुन अटक केल्या प्रकरणी व रेमडेसिविर औषधाच्या काळाबाजार केल्या प्रकरणी एका कर्मचार्यावर गुन्हा दाखल केल्या प्रकरणी तसेच; स्पर्श हॉस्पिटलकडून ऑटोक्लस्टर हॉस्पिटलचे काम काढून घेतल्या बद्दल वाघेरे यांनी महापोर उषा ढोरे,आयुक्त राजेश पाटील तसेच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे अभिनंदन केले. परंतु स्पर्श हॉस्पीटल दोन कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न होता 3 कोटी 28 लाख रुपयांची फसवणुक केली याप्रकरणी सखोल चौकशी करुन स्पर्शचे संचालक व संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदिप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटिल , पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, महापौर उषा उर्फ माई ढोरे, पुणे जिल्हाचे पालकमंञी अजित पवार यांचेकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, स्पर्श हॉस्पिटलने मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालयात व हिरा लॉन्स येथील कोविड सेंटरमध्ये बोेगस डॉक्टर्स व नर्सेस, आदि स्टाफ दाखवून त्या दोन्ही कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न होता सुमारे 5 कोटी 14 लाख रुपयांचे बिल महापालिकेत दाखल करुन 65 टक्के म्हणजे सुमारे 3 कोटी 28 लाख रुपयांचे बिल काहीहीं काम न करता घेवून महापालिकेची लुट केलेली आहे. या प्रकरणाची आपण राज्य शासनाचा ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी नेमूण सखोल चौकशी करावी. तसेच; या प्रकरणात कोट्यावधींचा लाभ घेणारे स्पर्श हॉस्पिटलचे संचालक व या प्रकरणी त्यांना भ्रष्टाचार करण्यास मदत करणारे महापालिकेचे संबंधीत अधिकारी यांच्यावर जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या पैस्यांची कोरोना काळात लुट केल्याबद्दल फौजदारी स्वरुपाचे फसवणुकचे गुन्हे दाखल करावेत.
वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत स्पर्श हॉस्पिटलला जुन्या कामाबद्दल एकही रुपया बिल अदा करु नये व जुन्या जादा लुटलेल्या वसूल पात्र रकमा चौकशी नंतर वसूल कराव्यात. हॉस्पिटलला काम देताना निविदेतील तरतूदीपैकी जेवढा स्टाफ, डॉक्टर्स होता तेवढा स्टाफ व डॉक्टर्स त्या ठिकाणी नव्हते. परंतु; त्यांनी बिल पुर्ण संख्येने घेतलेले आहे. त्यामुळे जेवढा स्टाफ व डॉक्टर्स कामावर तेवढेच बिल देवून उर्वरीत प्रकरणी दंडात्मक कारवाई करावी. तसेच; काम दिल्याच्या पहिल्या दिवसापासूनची जादा बिलांची वसूली करावी. तसेच; या प्रकरणी महापालिकेची प्रचंड बदनामी झाल्याने स्पर्श हॉस्पिटलला कायमस्वरुपी काळ्या यादित टाकावे अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महापौर उषा उर्फ माई ढोरे, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना देण्यात आले आहे