शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी एक वाजता एकाने गोळीबार केला ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत,
या घटनेनंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे या आवाहनात अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे की माझ्या सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना कळवतो की आज जो काही प्रकार घडला आहे त्यामध्ये मला किंवा अन्य कोणालाही काही झालेले नसून मी सुखरूप आहे तरी सर्वांनी संतप्त न होता कोठे गर्दी करू नका व पुढील तपास पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याचा सोक्षमोक्ष ते करतील ,कृपया आपण शांतता बाळगा, कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे
या घटनेविषयी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले,”अॅन्थनी म्हणून एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तीन साडेतीन वर्षांपासून तो आमच्याकडे काम करतोय. त्याचा तान्हाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझ्या पीएने फोन केला होता. मागच्या दहा दिवसांपासून त्याला फोन करतोय. दोन मुलं कामाला घे इतकंच त्याला सांगितलं होतं. बोलतानाच त्याने अरेरावी केली. तेव्हढंच झालं. त्यानंतर तो आज सकाळी आला. माझ्यासोबत त्याचं बोलणं झालं. मी त्याला विषय सोडून द्यायला सांगितलं. त्याच्या मालकालाही मी याबद्दल बोललो. दरम्यान, तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबारच केला. येताना तो पूर्वनियोजन करुनच आला असावा, कारण त्याने सोबत त्याचा साथीदार, त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल होतं,” असं आमदार बनसोडे म्हणाले.
कोणतीही वादावादी झाली नाही. त्याने वाद घातला. मग माझ्या कार्यालयात काही कार्यकर्ते होते. त्यांनी ते बघितलं. त्यांनी त्याला शिवीगाळ केली. त्याने गोळीबार केल्यानंतर मुलांनी त्याला धक्का देऊन खाली पाडलं. नंतर त्याला मारहाण केली. तोपर्यंत त्याने दोन फैरी झाडल्या होत्या. पहिली गोळी माझ्या दिशेनं झाडली. पण, एका मुलाने धक्का मारल्याने ती दुसऱ्या दिशेला गेली. त्याला कुणी पाठवलं होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. कचऱ्याचा कंत्राटदार जर पिस्तुल बाळगणारे सुपरवायझर ठेवत असेल, तर कसं व्हायचं,” असा सवालही बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.