पुणे – दिनांक 12/05/2021 रोजी पुणे जिल्हयातील एकुण 626 कोविड हॉस्पीटल्समध्ये असलेल्या 16293 फंक्शनल
बेडसच्या प्रमाणात 6530 इंजेक्शनसचा पुरवठा हॉस्पीटलसला स्टॉकिस्ट मार्फत करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणा-या
माहितीच्या आधारे सर्व रुग्णालयांना त्यांचे बेडसच्या प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत आहे.
सदर बाबत असे ही निदर्शनास आले आहे की, हॉस्पीटलमार्फत रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन विकत
आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देण्यात येते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. हे इंजेक्शन सध्या बाजारात उपलब्ध
नाही. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देण्यात आल्यामुळे त्याचा
काळाबाजार होण्यास चालना मिळत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोणतेही हॉस्पीटलने रुग्णांच्या नातेवाईकांना
रेमडेसीवीर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रिस्क्रीप्शन देण्यात देऊ नये. अशी बाब आढळून आल्यास संबंधीत हॉस्पीटल यांना
केला जाणारा रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा गोठवण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्वतंत्र
परिपत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.
दिनांक 16/04/2021 पासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपलब्ध साठा दैनंदीन तत्वावर सर्व रुग्णालयांना समान
तत्वावर वाटप करण्यात येत आहे. जेणेकरुन सर्व कोविड हॉस्पीटलमध्ये त्यांचे रुग्णांना थेट साठा उपलब्ध होईल. पुणे
जिल्हयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दि.11/04/2021 पासुन 24 x
7 रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखणेचे अनुषंगाने शहरी भागात 6
भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली असून त्यांचे मार्फत
रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिवीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवणेत येत आहे.
आरोग्य विभागाचे निर्देशानुसार गरजु रुग्णांना या इंजेक्शनचा वापर करावा, असे सर्व रुग्णालयांना निर्देश देण्यात येत
आहेत.