शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी – मनपा आयुक्त .राजेश पाटील यांनी मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व संबंधितांसोबत बैठक आयोजित केली. कोविड-१९ तिसरी व्हेव ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यासाठी वाय.सी.एम.एच. रुग्णालयामध्ये १५० ते २०० बेड राखीव ठेवणे. तसेच १५-१५ बेडचे दोन आय.सी.यू. तयार करणे, पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालय हे लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय म्हणून तयार करणे व त्याठिकाणी १०० ऑक्सिजन बेडची उपलब्धता असेल.
मासुळकर कॉलनी येथील प्रस्तावित Eye हॉस्पिटल हे लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय म्हणून ५० बेड साठी तयार करणे. तसेच पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स आणि रुग्णालय याची माहिती घेवून व त्याबाबत तयारी करणे. तसेच पिंपरी वाघेरेयेथील १०० फुटी रस्त्यालगत असलेल्या म्हाडा इमारती मनपाने ताब्यात घेवून त्या ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करणेसंबंधी निर्णय घेण्यात आला. यासाठी लागणारी सर्व साहित्य, उपकरणे, लहान मुलांसाठीचे वेंटीलेटर्स उपलब्ध करणे व त्यासाठीचा लागणारा मनुष्यबळ व आवश्यक तो औषधे साठा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या