शबनम न्युज / मुंबई
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र सरकारने केवळ भारत बायोटेक, स्पुतनिक आणि सिरमच्या लसीला परवानगी दिली असताना मुंबई शहराच्या आसपास मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दुतावासांना कसे करण्यात येते याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
मॉडर्ना कंपनीची लस विशेषतः फ्रान्सच्या लोकांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येत आहे. सध्याच्या काळात देशातील लोकांना लस मिळत नाही. हा गंभीर प्रश्न असताना हे लसीकरण कसे सुरू आहे आणि या लसीकरणाला विशेष परवानगी देण्यात आली का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.
Advertisement