शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कामास असलेल्या कर्मचा-यापैकी अनेक कर्मचारी हे बढतीस पात्र असून देखील त्यांना बढती न देता त्याच पदावर वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधेर्यावर व एकूणच कामकाजावर परिणाम दिसून येत आहे.
मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय यांचे निर्णय देखील अशा कर्मचा-यांचे बाजूने असताना देखील त्यांना बढतीमध्ये डावलण्यात येत आहे तरी दिनांक ७ मे २०२१ रोजीचा शासन आदेश तात्काळ अंमलबजावणी करून पात्र कर्मचा-यांना तात्काळ बढती देण्यात यावी, असे निवेदन पिंपरी युवासेनाचे विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.
Advertisement