शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेली राजेंद्र तरस सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने तसेच राजेंद्र तरस यांच्या मित्रपरिवार यांच्या वतीने गेले 20 दिवस या कोरोना काळात गरजवंतांना अन्नदान वाटप सुरू आहे. या अन्नदाना मध्ये मुस्लिम समाजातील एकही नागरिकाला या अन्नदानाचा उपवास असल्याने लाभ घेता आला नाही, त्यामुळे या पवित्र रमजान महिन्यातील उपवास सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांना फळे वाटप करण्यात आले.
Advertisement
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस यांच्यावतीने जवळपास 350 फळांचे किट वाटप करण्यात आले. विकास नगर परिसरात राजेंद्र तरस यांच्या राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन वतीने अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जाते. त्यांच्या या सामाजिक कार्याचे संपूर्ण विकास नगर किवळे परिसरात चर्चा होत आहे. तसेच सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.